Tejashree Pradhan and Ashutosh Patki together again | तेजश्री-आशुतोष पुन्हा एकत्र | Lokmat Filmy

2022-02-12 7

Tejashree Pradhan and Ashutosh Patki together again | तेजश्री-आशुतोष पुन्हा एकत्र | Lokmat Filmy

छोट्या पडद्यावरील अत्यंत गाजलेली मालिका अग्गंबाई सासूबाई या मालिकेतील शुभ्रा आणि सोहमची जोडी प्रेक्षकांना बरीच आवडली होती. अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता आशुतोष पत्की यांनी ही भूमिका साकारली होती. आता या मालिकेनंतर हे दोघही पुन्हा एकदा एकत्र दिसून येणार आहेत. तेजश्रीने नुकताच एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. या व्हिडीओत दोघही कसलं तरी शुटिंग करताना दिसून येतायेत. या शुटिंग दरम्यानचा हा बीटीएस व्हिडीओ तेजश्रीने शेअर केलाय. तेजश्री आणि आशुतोष यांनी मिळून सुरू केलेल्या स्टोरी वाईन्स या पेजसाठी हा व्हिडीओ हे दोघही करत असल्याचं कळतयं. हा व्हिडीओ शेअर करत तेजश्रीने कॅप्शनमध्ये, “ ”new vine” on story vines is on ur way... Are you excited..” असं लिहिलं आहे. तेजश्री आणि आशुतोषला पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी चाहते मात्र खुपच उत्सुक आहेत.

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires